pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना येथे पार पडली ‘मान्सून अंडर-१४ क्रिकेट लीग २०२५’

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.10
जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालना आणि साई काणे क्रिकेट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दानकुवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर ‘मान्सून अंडर-१४ क्रिकेट लीग २०२५’ यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत जालना शहरातील पाच युवा संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे आयोजन लीग पद्धतीने करण्यात आले होते. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेच्या शेवटी, स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना ‘बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट’ आणि ‘बॉलर ऑफ द टूर्नामेंट’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
यात बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट’ कान्हा उपाध्याय यास तर बॉलर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने साद शेख यास गौरविण्यात आले.
या समारंभासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र देशपांडे, खजिनदार ॲडव्होकेट श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स मेंबर व टूर्नामेंट कमिटीचे सेक्रेटरी राजू काणे आणि जॉईंट सेक्रेटरी अभिजीत चव्हाण तसेच संतोष भारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जालना जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक युवा क्रिकेटपटू आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेमुळे जालना जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची एक चांगली संधी मिळाली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे