pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना जिल्हा मजुर कामगार सहकारी संस्थेच्या निवडणुका : आठ उमेदवार बिनविरोध निवडून

काँग्रेसचे विनोद भैय्या यादव यांच्या हस्ते सत्कार

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.20

जालना जिल्हा मजुर कामगार सहकारी संस्थेच्या २०२५-२०२९-२०३० या कालावधीसाठीच्या निवडणुकीत एकूण आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार काँग्रेस नेते विनोद भैय्या यादव यांच्या हस्ते करण्यात आला. निवडून आलेल्या सदस्यांना पेढे देऊन व पुष्पहार अर्पण करून त्यांचा गौरव करण्यात आला.

जिल्ह्यातील सुमारे तीनशे मजुर सहकारी संस्था दरवर्षी बांधकाम विभाग, पाटबंधारे, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि इतर शासकीय विभागांची कोट्यवधी रुपयांची कामे पार पाडतात. त्यामुळे या संस्थेच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील कामगार आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित घटकांचे विशेष लक्ष लागले होते.

बिनविरोध निवडलेले उमेदवार असे : जालना शहर मतदारसंघातून अभयकुमार धन्नाबाई बलीराम व रविंद्र चंदकांत जगदाळे, जालना ग्रामीणमधून दादाराव माणीकराव पाचफुले, जाफराबादमधून वसंतराव शेषराव ढवळे, परतूरमधून सय्यद अकबर सय्यद अजीम, मंठा मतदारसंघातून रमेश रामराव कुलकर्णी, अंबडमधून संभाजी भास्कर वाकडे तर धनसांवगीतून नानासाहेब अप्पासाहेब उगले.

या कार्यक्रमाला महेंद्र रत्नपारखी, सतीश देशमुख, किरण किल्लेदार, नटवर किल्लेदार, नाना बारगाजे, बाबासाहेब वानखेडे, राजु पाटील, राजेंद्र गोरे, सुरेश रत्नपारखी, प्रभु सांगोळे, वंश यादव, अंश यादव आणि सारांश यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, बदनापूर (१), भोकरदन (१), अनुसूचित जाती-जमाती (१), विमुक्त जाती-भटक्या जमाती (१), इतर मागासवर्गीय (१) आणि महिला राखीव (२) या मतदारसंघांतील निवडणुका ३० ऑगस्ट २०२५ रोजी पार पडणार आहेत. याच दिवशी निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे.

या निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी उमेशचंद्र हुशे आणि सहाय्यक महेश जयरंगे जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले जाणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे