pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

शिवचैतन्य प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी सोहळ्याची जय्यत तयारी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.20

शिवचैतन्य प्रतिष्ठान, जालना यांच्या वतीने शहरातील चंद्रशेखर आझाद मैदानावर दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४ ते रात्री १० वाजेपर्यंत भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील तीन वर्षांपासून प्रतिष्ठानतर्फे या सोहळ्याचे आयोजन होत असून यंदा या सोहळ्याचे चौथे वर्ष आहे. दहीहंडी सोहळ्याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. ना. श्रीमती पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पालकमंत्री) भूषवणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रतीक भास्करराव पाटील दानवे यांनी दिली.

या कार्यक्रमाला आ.बबनराव लोणीकर, आ.अर्जुनराव खोतकर, आ.नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे, आ.हिकमतराव उढान, माजी आ.राजेश टोपे, माजी आ.कैलास गोरंट्याल, माजी आ.अरविंद अण्णा चव्हाण, मा.भास्करराव आंबेकर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी.एम., अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, उद्योजक घनश्याम शेठ गोयल, राजेंद्र राख, राजेशजी राऊत, अशोक पांगारकर, बद्रीनाथ पठाडे, सतीश जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जालना शहरातील नागरिकांनी या भव्य दहीहंडी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवचैतन्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रतीक भास्करराव पाटील दानवे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे