pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरणार – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.8

जालना जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत मंजूर निधी सर्व विभागांनी वेळेत पूर्ण खर्च करावा. एकही पैसा परत जाता कामा नये. निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिले.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025-26 आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की, यंत्रेणेने जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा चांगला वापर करणे गरजेचे आहे. काम झालेल्या ठिकाणांचे जिओ टॅगींग छायाचित्रे सादर करावेत. काम अपूर्ण राहिले असल्यास त्याची इत्यंभूत माहिती घेवून बैठकीस हजर राहणे आवश्यक आहे. निधी दिल्यानंतर वेळेत निधी खर्च व्हायला पाहिजे. निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच काम करण्यासाठी नेहमी उत्साही रहावे. तसेच चुकीची कामे अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत त्यामुळे नियमानूसार कामे वेळेत करावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सन 2024-25 खर्चाचा आढावा, सन 2025-26 नियोजनाबाबत, अखर्चित निधीबाबत माहिती, स्पिल कामांच्या याद्या व आवश्यक निधी , सन 2024-25 पर्यंत प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र याचा आढावा घेण्यात आला. यावेळी आता प्रत्येक कामांना युनिक आयडी देण्यात येणार असल्याचेही नियोजन विभागाकडून सांगण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे