अकोला देव येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ. दहा दिवस नित्य कार्यक्रमाची रेल चेल. तालुक्यातील भाविकांची मोठे श्रद्धा स्थान.
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.24
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी देऊळगावराजा रोड वरील अकोला देव येथील श्री जगदंबा मंदिर संस्थान येथे नवरात्र उत्सवाला मोठ्या श्रद्धेने सुरवात झाली.जवळपास 125 वर्ष जुने आसलेल्या हे प्राचीन मंदिर तालुक्यातील सर्वांचे मोठे श्रद्धा स्थान बनले आहे. पहिल्या माळ पासून येथे देवीचे जागरण नामस्मरण दोन्ही वेळी विशेष प्रसाद रुपी सेवा उपवास करणाऱ्यासाठी विशेष व्यवस्था अशी नित्य नियम सेवा सुरू असून येथील वेद शास्त्री श्री अशोक महाराज जोशी यांच्या विशेष मार्गदर्शन आणि सेवा मुळे येथे दिवसभर काही ना काही कार्यक्रम सुरु असतात.
नवरात्र देवीच्या विशेष प्रतीक असल्यामुळे येथे शाळेतील व गावातील लहान मुली विद्यार्थिनी साठी विशेष प्रसादी केल्या जाते. अकोला देव येथील भजनी आणि भक्त मंडळी येथे विशेष सेवा देत आहे.येथे दोन्ही वेळी विशेष अन्नदान गावातील भक्त मंडळी करून केल्या जाते. शेवटी दसऱ्याच्या दिवशी दहाव्या माळी ला येथे मोठे अन्नदान आणि मोठ्या भंडारा चे आयोजन केल्या जाते या साठी सगळ्या गावकरी मिळून मदत करून हे सगळे कार्य पार पाडल्या जाते. हे सगळे कार्य पार पाडण्यासाठी येथील विश्वस्त मंडळ दादाराव सावडे अध्यक्ष रतन कापसे उपाध्यक्ष विठ्ठल सावळे सचिव यांच्यासह अनिल कुलकर्णी भाऊराव सवडे भगवान सवडे दशरथ जाधव बाजीराव सवडे मुकुंदा शेडगे रामराव मोडेकर शंकर कदम ॲड गजानन शिरसागर व मुख्य पुजारी अशोक जोशी हे विशेष परिश्रम घेत आहे.


