निंभार्णी येथे नव दुर्गाउत्सव मंडळ यांची विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली,
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
ता.मोर्शी/प्रतिनिधि,दि.5
निंभार्णी येथील नव दुर्गाउत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली देवीच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली. मोठ्या उत्साहात, पारंपरिक पद्धतीने देवी विसर्जनसाठी वर्धा नदी येथे रवाना झाली. विधिवत पूजा झाल्यानंतर विसर्जन करण्यात आले. या सोहळ्यात भाविकांची अलोट गर्दी होती मिरवणूक सादरीकरण लक्षवेधी ठरले. विविध पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस प्रात्यक्षिकांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
निंभार्णीत विविध देखावे लक्षवेधी
नवरात्रोत्सवाच्या समारोपाला मोर्शी तालुक्यातील विविध नवदुर्गांचे विसर्जन जल्लोषी वातावरणात पार पडले. यानिमित्ताने शहरातून काढलेल्या विसर्जन मिरवणुका भाविकांसाठी खास आकर्षण ठरल्या. मिरवणुकांमधील देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भवानी माता, साईबाबा, गणपती यांचे हालते देखावे तसेच विविध पौराणिक देखावे लक्षवेधी ठरले


