आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ऋणानुबंध व नियुक्तीपत्र वितरण २६० सन्मानित व्यक्तींचा ऋणानुबंध सोहळा सोहळा संपन्न.
नांदेड/प्रतिनिधी,दि.27
साईबाबा मंदिर सभागृह जुना कौठा, नांदेड येथे ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधील पदाधिकारी, सदभक्त मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन प्रतिमेचे पुजन महंत श्री १००८ प्रयागगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर,
सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून माजी मंत्री सन्माननीय माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर ,श्री.बालाजी पांडागळे साहेब, मार्गदर्शक रावसाहेब पा. शिराळे, दत्तराम पा. येडके, संस्थेचे सचिव व्यंकटराव पा. जाधव,उत्तमराव टाक नांदेड जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ महाराज मिरकुटे, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ चक्रवार सावकार, सचिव बालाजी पा.शिंदे माळकौठेकर, संपर्कप्रमुख दिनाजी सांगळे बामणीकर, परभणी जिल्हा अध्यक्ष आकाश महाराज खोकले, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष उत्तमराव मल्हारे, संपर्कप्रमुख शिवानंद पाशावर, महिला आघाडी अध्यक्ष अनिताताई पतंगे, उपाध्यक्षा कान्होपात्राताई कुंडलवाडीकर, कुसुमताई शिंदे संपूर्ण महिला आघाडी संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
प्रस्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राम महाराज पांगरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ते पंढरपूर येथे धर्मशाळेच्या उभारणीसाठी परिवारातील सर्वांनी केलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.त्याच बरोबर पंढरपूर येथे धर्मशाळा बांधकामासाठी निधी देण्याबाबत सर्वांना आवाहन केले.
प्रमुख पाहुणे मा. भास्कररावजी पाटील खतगावकर यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये धर्मासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन धर्मकार्य केले पाहिजे असा मोलाचा संदेश दिला.त्यांनी स्वतः ५१००० रुपये देणगी या कार्यासाठी दिली. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित २५० साधकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ चक्रवार सावकार यांच्याकडून करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ओमप्रकाश ढाले यांनी केले
आभार संस्थेचे जिल्हा अध्यक्ष पंढरिनाथ मिरकुठे यांनी केले.
या कार्यक्रमात शेकडो पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. असे प्रसिद्धीपत्र राज्य प्रसिद्धीप्रमुख चंपतराव पा. डाकोरे यांनी दिली.


