[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.27
राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्वाचे
असल्याचे प्रतिपादन शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव
मगरे यांनी केले.जालना तालुक्यातील वाघ्रुळ येथे दलित आदिवासी मेळावा घेण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्कर मगरे बोलताना म्हणाले, दलित आदिवासी जाती-जमातीचे मूलभूत
प्रश्नावर शिवसेना दलित आघाडीच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे. दलित आदिवासी सोबतच गावगाड्यातील अनेक
समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न जालना जिल्हा शिवसंपर्क सामाजिक अभियानातून सोडविण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. दलित आदिवासी,
भूमिहीन कास्तपट्टे प्रलंबित प्रश्न, गावगाड्यातील घरकुले प्रश्न जागेविना अनेक लाभार्थी वंचित आहेत.
सर्वांसाठी घरे-२०२२-२४ अधिनियमानुसार मागेल त्याला घर आणि राहील तिथे घर लाभार्थी गावठाणमध्ये राहत असेल तर गावठाण ८ अ उत्तरेला नोंद घेऊन समोर
ठेवून त्या लाभार्थ्याला घरकुल देण्यात यावे तसेच गायरानात रहात असेल तर २०११ पूर्वीचा पुरावासमोर ठेवून त्या लाभार्थ्याला घरकुल देण्यात यावे
असे सर्वांसाठी घरे ग्रामीण २०२२-२४ मध्ये नमूद असताना प्रशासकीय यंत्रणा या अधिनियमाचे अंमलबजावणी करत नाहीत अंमलबजावणी केल्यास उपेक्षित समाजातील एक ही लाभार्थीघरकुलापासून वंचित राहणार नाही.पुढे मगरे म्हणाले की, त्याचप्रमाणे निराधाराचा निराधाराच्या मासिक दे
अनुदानात दीड हजार ऐवजी तीन हजार रुपये केल्यास निराधार चांगल्या पद्धतीने जगू शकतील. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तरुणांमध्ये बेकारीचे
प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तेव्हा शासकीय आर्थिक विकास महामंडळाकडून उदाहरणार्थ महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ या व इतर
महामंडळाकडून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना कर्ज वितरण ग्रामीण भागातील तरुण बेरोजगारीला हातभार लागल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून
शिवसेना दलित आघाडीच्या वतीने शिवसंपर्क सामाजिक अभियानामार्फत व लोक आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्या जात आहे आणि म्हणून
जनतेचे जीवनमान सुधारणारे प्रश्नाचे सोडवणूक झाली पाहिजे म्हणून यासाठी राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे, असेही अॅड. मगरे म्हणाले.
याप्रसंगी जय खरात,अण्णासाहेब बाळराज यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]