जे बी के विद्यालय व नवभारत कनिष्ठ महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत तीन खेळाडूंची विभागावर निवड.
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.2
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे 1 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद जालना, यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना द्वारा आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन S R P जालना येथे करण्यात आले.
श्रीमती जे बी के विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत यश प्राप्त केले.
कु. ऋतुजा विलास खांडेभराड 17 वयोगटातून शॉट पुट व हॅमर थ्रो मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला तसेच गौरव शिवहरी खरात यांने सुद्धा वयोगट 19 गटातून गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक मिळविला, तसेच जयेश संतोष सांगुळे 17 वयोगटातून भाला फेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवला….
या सर्वांची निवड विभाग स्तरावर झालेली आहे . येत्या सात व आठ तारखेला बीड येथे विभागीय स्पर्धा होणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक विष्णू जाधव, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिक्षक सखाराम बोरकर, पर्यवेक्षक संजय कुलकर्णी, संस्थेचे संचालक तथा प्राध्यापक दत्ता देशमुख, प्राध्यापक सुनील बनसोडे, प्राध्यापक अरुण आहेर, प्राध्यापक रामदास भांगे, प्राध्यापक कैलास जाधव, प्राध्यापक गजानन धोटे, प्राध्यापक डॉक्टर आनंद जाधव, दिवसान ससाने, कैलास भुतेकर, दिनकर उखर्डे, दत्ता उखर्डे, रवींद्र मोरे, राजेंद्र जगताप, क्रीडा विभाग प्रमुख राजेश शेवाळे, समाधान कांबळे, आवटी मॅडम, शेख मॅडम, भिलावेकर मॅडम, कळंबे मॅडम, पाटील मॅडम, लंबे मॅडम, राजू डोमळे, नागोराव देशमुख दीपक देशमुख, सर्व विद्यार्थी, यांनी अभिनंदन केले आहे.


