pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मोतीगव्हाण येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधून अनेक युवकांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

विश्वास दिलात तर विकास हमखास - रावसाहेब पाटील दानवे ● विकास कामे केली म्हणूनच जनता आमच्यासोबत – आ. बबनराव लोणीकर

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.24

जालना तालुक्यातील मोतीगव्हाण येथील युवकांनी राष्ट्रवादीतून (अजित पवार गट) मधून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून त्यांनी जाहीर प्रवेश केला.

मोतीगव्हाण चे सरपंच विजय मोहिते यांच्या पुढाकाराने व समन्वयातून निवृत्ती कृष्णाजी घडलिंग, छत्रगुण देविदास मोहिते, आबासाहेब नानाभाऊ मोहिते, गौतम पटेकर, अंकुश पटेकर, शिवाजी विलास लाखे, प्रल्हाद डीखूळे, सचिन पटेकर, दादाराव पटेकर, चित्रहार पटेकर, अंकुश पटेकर, पांडुरंग मोहिते, निखील मोहिते आदींनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी श्री. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा विकास आणि जनसेवा यांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. युवकांचा उत्साह आणि ताकद पक्षाला नवी ऊर्जा देणार असून त्यांच्या पाठिंब्यामुळे संघटन मजबूत होईल असे दानवे यांनी सांगितले.

यावेळी आ.बबनराव लोणीकर म्हणाले की, शेतकरी, गरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भारतीय जनता पक्ष सातत्याने काम करत आहे. मोतीगव्हाण येथील तरुणांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या सहभागामुळे स्थानिक विकासाला आणखी गती मिळेल असे लोणीकर यांनी नमूद केले.

यावेळी महेश निकम, संतोष लोखंडे, सिद्धिविनायक मुळे, वसंत शिंदे, विष्णू मोहिते, महादेव मोहिते, सावळीराम मोहिते, नारायण मोहिते, सुमित सुरडकर, अंकुश बोबडे, ज्ञानेश्वर शेजूळ, रोहित नलावडे, नारायण पवार, संदीप चव्हाण आदींची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे