सभासदाच्या योजना ठरल्या प्रभावी
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.26
सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना, शिस्तबद्धपणे कर्ज वाटप कर्जवसुलाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न यामुळे जाफराबाद जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था आली नावारूपास जिजाऊ सावित्री कन्यादान योजना, सेवानिवृत्त सभासद योजना, सन्मान ठेव योजना ठरल्या प्रभावी*
सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना, शिस्तबद्धपणे कर्ज वाटप कर्जवसुलाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न यामुळे जाफराबाद येथील जिल्हा परिषद शिक्षक आणि शालेय सेवकांची सहकारी पतसंस्था ही जालना जिल्ह्यामध्ये नावलौकिक मिळवत आहे. जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था ही सर्व सभासदांचे सहकार्य आणि संचालक मंडळ यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे नावारूपास आली आहे.2023मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सभासद पॅनल विजयी होऊन त्यावेळी 14 जानेवारी रोजी चेअरमन पदावर विनोद कळंबे, व्हॉइस चेअरमन पदावर प्रदिप ताठे तर मानद सचिव पदावर वसंता शेवाळे विराजमान झाले होते.पुढील दोन महिन्यात सभासदांच्या हितासाठी जिजाऊ सावित्री कन्यादान योजना ही अस्तित्वात आणली गेली. यामध्ये ज्या सभासदाच्या मुलीचे लग्न आहे अशा एका मुलीला 11 हजारांचा धनादेश तिच्या नावे देण्यात येतो.आजपर्यंत या योजनेचा लाभ 25 सभासद कन्याना झाला आहे.याशिवाय 5लाख रुपये 1वर्षासाठी ठेवल्यावर एक चांदीचे आकर्षक नाणे ही भेट देण्यात येते.3मार्च 2025 ठरल्या प्रमाणे तात्कालीन चेअरमन विनोद कळंबे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या पदावर निवडणुकीद्वारे गणेश पवार यांची निवड करण्यात आली होती. जुलै महिन्यामध्ये तत्कालीन सचिव वसंता शेवाळे यांनी राजीनामा दिल्यामुळे संजय लोखंडे यांची या सचिव पदावर निवड झाली होती. संस्थेच्या सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांसाठी सेवानिवृत सभासद सन्मान योजना सुरू करण्यात आली असून या माध्यमातून सेवानिवृत्त झालेले सभासदास २५०० रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येतो.मुदत ठेवीवर १० टक्के इतका व्याजदर देण्यात येत असल्यामुळे सभासद मोठ्या पद्धतीने ठेवी आपल्या हक्काच्या आणि सुरक्षित पतसंस्था असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेत ठेवत आहेत. यासाठी विद्यमान चेअरमन गणेश पवार, व्हॉईस चेअरमन प्रदीप ताठे, मानद सचिव संजय लोखंडे,विनोद कळंबे,वसंता शेवाळे, दिपक चव्हाण, छाया पुंगळे,सुखदेव अवकाळे, अभिजित साळवे, संजय निकम,किरण तिडके,गणेश फुकट, सुनीता खलसे, बद्रीनाथ जायभाये, कैलास बकाल , लिंबाजी कड, अनिल भोसले प्रयत्नशील आहेत.


