pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

पापळ येथे युनायटेड ग्लोबल फेडरेशनचा शालेय बॅग वितरण उपक्रम

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.26

युनायटेड ग्लोबल फेडरेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहाय्य मोहिमेअंतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पापळ (ता. जाफ्राबाद) येथे इयत्ता 1 ते 4 वीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रभरातील 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या या उपक्रमाचा हा आणखी एक यशस्वी टप्पा ठरला आहे.या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे आणि सामाजिक जबाबदारी जपली जावी हा उद्देश संस्थेने ठेवला असून या वितरणावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले कार्यक्रमादरम्यान युनायटेड ग्लोबल फेडरेशन चे दुर्गेश विष्णू बनकर, विशाल नवले, अनुराग जाधव, संकेत नवले, ज्ञानेश्वर शास्त्री सर, समाधान नवले, कुलदीप नवले, उमेश गिराम, नामदेव मोरे आणि प्रेमानंद जाधव उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापकांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करत संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. तसेच शिक्षकांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शैक्षणिक प्रगती सकारात्मक दिशेने वाढत असल्याचे सांगितले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे