pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

“समाजाला आधुनिक विचारांचा वारसा देणारे महात्मा फुले ! – प्रा. प्रल्हाद लुलेकर”

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.30

मराठवाडा शिक्षक संघातर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त गांधी भवन येथे व्याख्यानमालेचे आयोजन केले होते यावेळी भाई चंद्रकांत चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा प्रल्हाद लुलेकर यांनी ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकत महात्मा फुले यांचे समाज सुधारणेसोबत शैक्षणिक आणि देशाच्या विकासात भरीव योगदान दिले हे समजून सांगितले. तसेच माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख साहेबांनी टि ई टी समस्या नसून तीला सामोरे जावे लागेल हे अंत्यंत कायद्याच्या चौकटीत बसून कसा मार्ग काढायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थित शिक्षकांच्या समस्याचे उत्तम रित्या निराकरण केले. आणि अध्यक्षीय भाषणात प्रा डॉ उमाकांत राठोड यांनी शिक्षण प्रणालीतील भ्रष्टाचार व गुणवत्ता कशी खालावत चालली आहे व त्याला जबाबदार कोण ? हे स्पष्ट व परखड शब्दात समजून सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सोनाली गव्हाणे यांनी केले. प्रमुख पाहूण्यांचा परिचय रावसाहेब बोरसे यांनी केला आणि आभार प्रदर्शन हे विनोद केनेकर यांनी केले यावेळी संघटनेचे पदाधिकारी नवनाथ मंत्री, अशोक ढमढेरे, विलास चव्हाण, डॉ. पद्माकर पगार, तुकाराम भवर, धनंजय भवर ,नाना सावंत, महाजन सर विलास चांदणे, विलास भुतेकर, कृष्णा गोंडे, पोपट आगवान , रामेश्वर गोराडे, रवींद्र मगर, संभाजी जाधव, सचिन मुसळे, सागर सूर्यवंशी, अजित जाधव, विनोद जाधव, प्रताप कोल्हे, मानसी भागवत, अरुणा चौधरी, सविता हिंगे, शितल कवडे, रेखा साकळे, स्वाती बोंडे, अर्चना चव्हाण, वैष्णवी चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे