pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव येथे भारतीय संविधान दिन साजरा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.30

मानव विकास व पूर्ननिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाला विद्यार्थी अध्यक्ष म्हणून श्रीनाथ मोहिते व प्रमुख पाहुणे शुभम मोहिते हे होते. सूत्रसंचालन गौरव मोहिते या विद्यार्थ्यांने केले व आभार श्रीनाथ मोहिते याने मानले. या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधानाबद्दल मनोगत व्यक्त केले.तसेच संविधान दिनानिमित्त सकाळी गावात प्रभातफेरी काढून गावात संविधान जागृती कार्यक्रम आयोजन केले होते. संविधान सप्ताह निमित्त विविध उपक्रम यात रांगोळी, सेल्फी, निबंध इत्यादी राबवले गेले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.सुनीलजी वाकेकर तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती.जयश्रीताई बनकर यांचे मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमानिमित्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे