राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या शहराध्यक्ष पदी शेख आरेफ यांची निवड

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.5
भोकरदन शहरातील दानापूर वेस भागातील रहिवासी शेख आरेफ गुलाम नबी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्षाच्या भोकरदन शहराध्यक्ष पदी पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष माजी आ अरविंद चव्हाण यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की,आपली भोकरदन शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वासामान्य जनते पर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.
पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना अजित पवार,खा प्रफुल्ल पटेल,प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष माजी आ अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागात पक्ष संघटन वाढविण्यासाठी कटीबद्ध व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नियुक्तीपत्र देताना भोकरदन -जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माजी सभापती लक्ष्मणराव दळवी, युवा नेते केशव जंजाळ आदींची उपस्तिती होती.
शेख आरेफ यांची शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.


