सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन.

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.6
.जाफराबाद येथील
सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शाम सर्जे यांनी भूषविले,या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्रा.मनिष बनकर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रा.अनिल वैद्य यांनी उपस्थितांनकडून त्रिशरण पंचशील वधवुन घेतले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा मनिष बनकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.डाॅ . बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या रुपाने देशातील सामान्य जन मानसाला कसा न्याय मिळवून दिला हेही आपल्या भाषणांतून सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ शाम सर्जे यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कामगीरीवर प्रकाश टाकला.ते म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशात विविध प्रकारचे कार्य केले आहे. हे देश विसरुच शकत नाही.याच कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयातील प्रा.अनिल वैद्य यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिमगीत गाऊन अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.संतोष पहारे यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.संदीप पाटील यांनी केले.कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा विनोद हिवराळे यांची उपस्थिती होती,तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


