राज्यातील ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचा हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधण्यासाठी दि.११ डिसे.२५ नागपुर मोर्च्याचे निमंत्रण देण्यासाठी बिलोली येथे ग्रंथालय पदाधिकारी कर्मचाऱ्याची बैठक संपन्न
आपल्या हक्कासाठी मोर्च्यात सहभागी व्हावे -गंगाधरराव धनूरे यांचे आव्हान

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.6
बिलोली तालुक्यातील ग्रंथालय चळवळीचे सन्माननीय पदाधिकारी तथा ग्रंथालय कर्मचाऱ्यांची महत्त्वपुर्ण बैठक संघटनेचे मार्गदर्शक मा.गंगाधरराव धनूरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली
या बैठकीत तालुक्यातील ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी विकास परिषेदेने ग्रंथालय चळवळीच्या प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी माजी.सास्कृतिक वने मंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार आ.अभिजीत वंजारी यांच्या नेतृत्वाखाली विधानभवन नागपूर येथे दि.११ डिसेंबर २०२५ रोजी मोर्चा आयोजित केले आहे .या मोर्चात पुढील प्रमाणे मागण्या खालिल प्रमाणे
१) राज्यातील ग्रंथालयाच्या 40% अनुदानावाढीच्या प्रास्तावित फाईलवर 2025 च्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी सही करून तत्वतः मान्यता दिले आहे. त्याची अध्याप अंमलबजावणी, शासन निर्णय काढण्यात आलेला नसल्यामुळे ते त्वरित काढण्यात यावा.
२) ग्रंथालयाच्या दर्जाबदल बाबतचे शासन निर्णय काढण्यात यावे.
३)ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात 6 तासावरून 8 तास करण्यात यावे.
४) ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात यावे व
ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दरमहा डिबीटी द्वारे त्यांच्या बॅक खात्यात थेट वेतन जमा करण्यात यावे.
.इतर अनेक प्रलंबित मागण्यासाठी नागपूर येथे होत असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर राज्यव्यापी मोर्चा विधानभवन नागपूर येथे काढण्यात येणार आहे तरी या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन ग्रंथालय कर्मचारी विकास परिषेदेचे नेते गंगाधरराव धनूरे साहेब यांनी केले आहे यावेळी राज्य ग्रंथालय कर्मचारी विकास परिषेदेचे विभागीय अध्यक्ष गंगाधर पोतंगले, जिल्हा अध्यक्ष बालाजी आचमे,जिल्हा उपाध्यक्ष .केशव वनंजे ,संजय पोकरणे ,जिल्हा सचिव पुंडलिक कदम,सुभाष पाटील,भैया पवार,माधव कवळे,अविनाश लिंबेवाड, तालुक्यातील इतर ग्रंथालय कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
असे प्रसिध्दी पत्रक ग्रंथालय कर्मचाऱ्यारी संघटना बिलोरी यांनी दिले.


