कुंबेफळं सिंदखेड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरी निर्वाणदिनानिम्मित अभिवादन.

जालना-प्रतिनिधी, दि.7
जालना जिल्हातील कुंबेफळ सिंदखेड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरी निर्वाण दीना निम्मित अभिवादन करण्यात आले.
या निम्मित गावातील सरपंच सुधाकर खरात व तंटा मुक्ती चे अध्यक्ष गोविंद गाडेकर यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्या ला पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले.तसेच गावातील अनेक युवकांनी डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्या ना पुष्प हार घालून अभिवादन केले.
या वेळी जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गाडेकर यांनी उपस्तित जनसमुदाय ला मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषना त डॉ बाबासाहेब यांचे विचार तसेच त्यांनी सांगितलेला शिक्षण विषयी चा नारा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. या विषयी मार्गदर्शन केले.
अभिवादन करण्या साठी गावातील लहान थोर, महिला व तरुण वर्गाचा मोठा सहभाग होता.
समाधान गाडेकर, यांनी त्रिशरण पंचशील घेत आभार व्यक्त केले.


