मा.ना. दादाजी भुसे साहेब, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य ,यांनी केले जाफराबाद येथील स्पर्धा परीक्षा विचार मंचचे कौतुक…

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.7
आज दिनांक 07 डिसेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या जाफराबाद स्पर्धा परीक्षा विचार मंच व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय नवोदय सराव परीक्षेच्या निमित्ताने झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांनी सर्वउपक्रमाची माहिती जाणून घेतली व या उपक्रमाची प्रशंसा केली .
या मोफत स्पर्धा परीक्षा विचार मंचासाठी कार्यरत असलेले श्री नारायण पिंपळे ,पंजाब दांदडे ,पंजाब क्षीरसागर ,माधव शिंदे सोपान शिंदे व संदीप डोबले यांचे व सर्व सहकाऱ्यांचे मनापासून कौतुक केले .
संपूर्ण राज्यासाठी हा उपक्रम प्रेरक असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्री नारायण पिंपळे यांनी या उपक्रमाविषयी विस्तृत माहिती सांगितली, माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले. डॉ. सतीश सातव यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले. यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक श्री कैलास दातखीळ यांनी मार्गदर्शन केले.


