22 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.11
देशातील पोस्टल सेवा ही सामाजिक आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये अपरोक्षपणे डाकघराच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना, संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. या तक्रारीचा योग्य प्रकारे न्याय निवाड़ा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामधे पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात. दि. 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयामधे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. असे प्रवर अधिक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


