pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजना मंडळाकडून नि:शुल्क आहेत. त्यासाठी कामगारांनी कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार करू नये. जर कोणतीही व्यक्ती आपणास याबाबत पैशाची मागणी करत असल्यास आपल्या जवळच्या लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो कार्यालयाशी किंवा जालना येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे
“महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ” हे सन 2012 पासुन कार्यरत आहे. मंडळाचे कामकाज दि. 1 जुलै 2020 पासून संपूर्ण हे संगणीकृत झालेले असून इमारत व बांधकाम क्षेत्रातील कामगारांची ऑनलाईन प्रणाली द्वारे नोंदणी, नूतनीकरण करण्यात येते. बांधकाम कामगारांची विविध माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी जालना जिल्ह्यातील सर्व नोंदित सक्रीय (जीवित) बांधकाम कामगारांनी कळविण्यात येते कि या कार्यालयाकडून कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीची, बोगस संघटना, दलाल, एजंटाची नेमणूक करण्यात येत नाही तसेच याचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालय कोणत्याही प्रकारे समर्थन करीत नाही. विविध माध्यमातून या कार्यालयाच्या नावाने बांधकाम कामगाराची नोंदणी, नूतनीकरण, विविध योजनेचे अर्ज, सुरक्षा संच व अत्यावश्यक संच व गृहपयोगी वस्तुसंच इ. घेऊन देतो या नावाखाली स्वयंघोषित एजंट आणि संघटनांकडून बांधकाम कामगारांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी अशा व्यक्तीपासून कामगारांनी सावधानता बाळगावी, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे