pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

वाहनधारक व चालकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांशी संबंधित बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल अॅप्स (APKs), तसेच मोबाइल SMS/WhatsApp द्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंक मोठ्या प्रमाणात नागरिकांना फसवित आहेत. यामुळे सर्व वाहन चालक / मालक यांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे.
सर्व वाहन चालक मालक यांनी परिवहन विभागाच्या खालील अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा : 1) वाहन नोंदणी सेवा (VAHAN) – https://vahan.parivahan.gov.in 2) ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) – https://sarathi.parivahan.gov.in 3) परिवहन सेवा – https://www.parivahan.gov.in 4) ई-चलन पोर्टल – https://echallan.parivahan.gov.in वरील सर्व अधिकृत संकेतस्थळे “.gov.in” ने समाप्त होतात. “.com”, “.online”, “.site”, “.in” अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाइटवर नागरिकांनी उघडू नये. फसवणूक करणाऱ्यांकडून पाठविले जाणारे संदेश बहुधा खालीलप्रमाणे असतात : आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी देण्यात येते व अनधिकृत लिंक पाठविण्यात येऊन त्वरित दंड भरण्याचे संदेश प्राप्त होतात. “DL (वाहन चालविण्याचा परवाना) सस्पेंड होणार आहे. त्वरित तपासणी करा.” RTO कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाईलमध्ये कधीही WhatsApp द्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही, याची नोंद घ्यावी. तसेच, “RTO Services apk”, mParivahan_Update apk”, “eChallan_Pay.apk” अशाअनधिकृत APK अॅप्सडाउनलोड करू नयेत, कारण त्याव्दारे OTP, बँकिंग माहिती व मोबाईलमधील इतर संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. नागरिकांनी कोणताही संशयास्पद संदेश, लिंक प्राप्त झाल्यास तात्काळ National Cyber Crime Portal – https://www.cybercrime.gov.in ठिकाणी तक्रार नोंदवावी. सायबर फसवणूक हेल्पलाईन 1930 जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे