विभागीय कर्मचारी/ अधिकारी क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉल मध्ये जालना जिल्हा उपविजेता…

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.14
सायगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील बी एम जी क्रीडा संकुल मध्ये संपन्न झालेल्या विभागीय कर्मचारी व अधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये अत्यंत चुरशीच्या व्हॉलीबॉल सामन्यामध्ये जालना जिल्ह्याच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.अंतिम लढतीमध्ये बीड जिल्ह्याने 15विरुद्ध 8 आणि 15 विरुद्ध 9 अशा दोन सेट्स मध्ये विजय मिळवित विजेतेपद पटकावले. जालना जिल्ह्याच्या विजयी संघामध्ये
कर्णधार संदिप जाधव,दीपक चव्हाण,किशोर महाजन
रमेश मांटे ,शशिकांत काचे
क्रांती मेरत,सारिका बोकन
सुलोचना तोटेवार,प्रफुलत्ता भिंगोले यांचा समावेश होता. उपविजेत्या संघाचे जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनू मॅडम, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, शिक्षण निरीक्षक डॉ सतिश सातव,जाफराबाद चे गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी जिनेंद्र काळे, रामकुमार खराडे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालके, तालुकाध्यक्ष विनोद कळंबे, जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन गणेश पवार, व्हाईस चेअरमन प्रदीप ताठे, मानद सचिव संजय लोखंडे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप साळोख,अखिल चे अध्यक्ष नसीम शेख,मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष अभिजित साळवे,शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुधाकर चिंधोटे, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अलजिलानी सर आणि सर्व शिक्षण विभागाने अभिनंदन केले आहे.


