pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

बदनापूर तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नवोदय प्रवेश पात्र परीक्षा सुरळीत संपन्न

सर्व परीक्षा केंद्रावर तहसीलचे बैठे पथक

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

बदनापूर/प्रतिनिधी, दि 13

आज (दि.13 ) बदनापूर तालुक्यातील जि. प. सेलगाव, जि. प. प्रशाला बदनापूर, कन्या हायस्कूल बदनापूर, साईबाबा इंग्लिश स्कुल बदनापूर या चार ही केंद्रावर जवाहर नवोदय प्रवेश पात्र परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. या चार केंद्रावर एकूण 1122 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावं नोंदवलेली होती त्यापैकी 1074 विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष परीक्षा दिली तर 48 विद्यार्थी गैरहजर होते. आज बदनापूर प.स. गटशिक्षणाधिकारी श्री डी. एन. क्षीरसागर  यांनी जि. प. सेलगाव व जि. प. प्रशाला बदनापूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन परीक्षा सुरळीत चालू असल्याचे live न्यूज महाराष्ट्र च्या प्रतिनिधीस कळवले आहे.

जवाहर नवोदय विद्यालयात प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलांना प्रवेश दिला जातो. किमान 75% जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. SC आणि ST समुदायातील विद्यार्थ्यांसाठीही त्यांच्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव आहेत, परंतु राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी नाहीत. या व्यतिरिक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबरोबरच ओबीसी विद्यार्थ्यांनाही आरक्षण दिले जाते. आज ही नवोदय प्रवेश पात्र परीक्षा बदनापूर तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नवोदय प्रवेश पात्र परीक्ष सुरळीत पार पडली या तहसील चे बैठे पथक परीक्षा केंद्रावर तैनात होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे