राज्यस्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धा उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनीधी,दि 16
महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या मान्यतेने जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनच्या वतीने दिनांक 12 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे आयोजीत 38 व्या सब ज्युनीयर राज्यस्तरीय टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धा 2025-26 प्रचंड प्रतिसादासह उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये 23 जिल्ह्यांचे मुलांचे 21 संघ तर मुलींचे 17 संघ सहभागी झाले होते. यातुनच केरळ येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला असुन त्यामध्ये नैतीक वर्मा (वाशीम), ललीत तिवारी (नागपुर शहर), तन्मय लावारवार (वाशीम), आराध्य गुंजाळ (अ.नगर), साहिल राठोड (वाशीम), समर्थ म्हस्के (जालना) यांची मुलांच्या संघात तर मुलींच्या संघात डिेंपल काळे (नागपुर ग्रामीण), अवंतीका कुर्लेकर (पुणे शहर), श्रद्धा बनसोड (नागपुर शहर), अबोली वासनीक (नागपुर शहर), अक्षरा ठाकरे (नागपुर ग्रामीण), प्रणाली फु लारी (जालना) यांची निवड करण्यात आलेली आहे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशचे महासचिव अनिल वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये जालनाचे जेष्ठ पत्रकार कैलास फु लारी, युनायटेड क्रिकेट असोसिएशनचे सचिव अॅड. अमजद पठाण, महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनचे कोषाध्यक्ष तथा रेफ्र ी बोर्ड चेअरमन अॅड. मृणाल बांडेबुचे, कनव्हेनर लकी समुद्रे, तांत्रीक समीतीचे कृष्णा ठाकरे, आयोजन समीतीचे अध्यक्ष शेख अहेमद हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन स्पर्धेचे मुख्य आयोजक शेख चाँद पी.जे. यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनचे अध्यक्ष जयंत राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उमेशचंद्र खंदारकर, गणेश लांडगे, अमोल काटकर, श्रीमती शेख महेजबीन, श्रीमती गिता संगम, श्रीमती करूणा निरेवाड, सुरेश त्रिभुवन, प्रविण जाधव, सचिन मोहीते, जावेद पठाण, अमीर पठाण, शेख साबेर, महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशन व जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी परीश्रम घेतले.
* चौकट *
“अन्नामृत फ ाऊंडेशनच्या वतीने खेळाडुंना भोजनाचा पुरवठा”
राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडु, प्रशिक्षक, पंच व पदाधिकारी तसेच जालना चे आयोजन समीतीचे सर्व सदस्य यांना अन्नामृत फ ाऊंडेशनच्या वतीने उत्कृष्ठ, पौष्ठीक व गरमागरम भोजनाचा पुरवठा करण्यात आला. यासाठी जिल्ह्याचे जेष्ठ समाजसेवक सुनीलभाई रायठठ्ठा यांचे सहकार्य लाभले. भोजनाच्या पुरवठ्यावर फ ाऊंडेशनचे व्यवस्थापक गणेश नखाते हे जातीने लक्ष ठेवुन होते. जेवनाचा आनंद संपुर्ण महाराष्ट्राने घेतला व असे जेवण आजपर्यंत कोणत्याही स्पर्धेत खायला भेटले नाही, जेवण खुपच चविष्ठ व पौष्ठीक होते असे मत जवळपास सर्वच व्यवस्थापक व खेळाडुंनी व्यक्त करत अन्नामृत फ ाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.
* चौकट *
“स्पर्धेला विविध मान्यवरांनी भेट देवुन शुभेच्छा व्यक्त केल्या”
स्पर्धेदरम्यान विविध मान्यवरांनी भेट देवुन आलेल्या खेळाडुंना शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे अभिनंदन केेले. यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष भास्कररावजी अंबकेर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ. सिमा काकडे, माजी नगरसेवक पिंटु रत्नपारखे, मुख्याध्यापक सुभाष पारे, क्रीडा संघटक विजय गाडेकर, अनील मांटे यांचा समावेश आहे.
* चौकट *
स्पर्धेचा अंतीम निकाल
सर्वसामान्य विजेते पद ः प्रथम – वाशीम जिल्हा, व्दितीय नागपुर ग्रामीण जिल्हा, तृतीय नागपुर शहर जिल्हा.
एकेरी ः मुले – प्रथम – नैतीक वर्मा (वाशीम), द्वितीय – ललीत तिवारी (नागपुर शहर), तृतीय – तन्मय लावारवार (वाशीम), चतुर्थ – आराध्य गुंजाळ (अ.नगर), मुली – प्रथम – डिेंपल काळे (नागपुर ग्रामीण), द्वितीय – अवंतीका कुर्लेकर (पुणे शहर), तृतीय – श्रद्धा बनसोड (नागपुर शहर), चतुर्थ – अबोली वासनीक (नागपुर शहर).
दुहेरी ः मुले – प्रथम – प्रथमेश व साहिल (वाशीम), द्वितीय – सुमीत व दया (पिंपरी चिंचवड), तृतीय – गौरव व सम्राट (सांगली), चतुर्थ – खुशाल व समर्थ (भंडारा), मुली – प्रथम – अक्षरा व अलिशा (नागपुर ग्रामीण), द्वितीय – आराध्या व आरोही (वाशीम), तृतीय – शिवरानी व प्राची (सांगली), चतुर्थ – तन्वी व स्वामीनी (अ. नगर).
मिश्र दुहेरी ः प्रथम – देवेद्रं व मानसी (जळगाव), द्वितीय – ओम व संस्कृती (नांदेड), तृतीय – देवाशीश व वैष्णवी (पुणे शहर), चतुर्थ – मोहम्मद अयान व संस्कृती (पिंपरी चिंचवड).


