pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

वीर वाजेकर महाविद्यालयाच्या कु. गौरव ठाकूर याची ऑल इंडिया आंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय फुंडे उरण मधील कु. गौरव ठाकूर ची मुंबई विद्यापीठाअंतर्गत ऑल इंडिया आंतर विद्यापीठ २७ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ मीरूर, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या नेमबाजी स्पर्धेसाठी निवड मुंबई विद्यापीठामार्फत झाली आहे. हि निवड मुंबई विद्यापीठाअंतर्गत इंटरझोन एअर पिस्टल स्पर्धा दि. १२, १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सी.एच.एम कॉलेज, उल्हासनगर यांच्या मार्फत अंबरनाथ राइफल अँड पिस्टल शूटिंग रेंज अंबरनाथ येथे पार पडल्या, या स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टलमध्ये मुंबई सिटी झोन आणि महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक मिळवून दिला.या यशाबद्दल कु. गौरव ठाकूर चे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी.जे.पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील, सुधीर घरत,भावना घाणेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक आणि जिमखाना प्रमुख देवेंद्र कांबळे व सर्व जिमखाना सदस्यांनी अभिनंदन केले आहे.गौरव ठाकूर यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे