प्रतिभा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे 100 शिक्षक क्लब जालना सामान्य ज्ञानस्पर्धेत यश

जालना/प्रतिनिधी, दि.21
शरद शिक्षण व संशोधन संस्था, जालना संचलित प्रतिभा माध्यमिक विद्यालय काजळा तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील विद्यार्थ्यांनी १०० शिक्षक क्लब जालना आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा 2025 यामध्ये रुपाली कृष्णा जाधव वर्ग 10 वी, तेजल भरत खोटे वर्ग 9 वा , श्रुती लक्ष्मण मांगडे वर्ग 8 वा यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवले तर करण कोळेकर वर्ग 6 वा, हरिओम वाल्हुरे वर्ग 6 वा,ज्ञानेश्वरी मांगडे आणि रोहित जाधव,वर्ग 6 वा यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केलेले आहे. त्यांचा जालना येथे सन्माननीय जेष्ठ विचारवंत एम. जोशी, १०० क्लब चे अध्यक्ष राजेभाऊ मगर, बालसिहत्यिक डॉ. विशाल तायडे, अधिव्याख्याता श्रीहरी दराडे व इतर मान्यवर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला व विद्यालयातील शिक्षकांचे कौतुक केले . या यशाबद्दल विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


