डॉक्टर बबनराव महामुणे यांची सहाव्या राज्यस्तरीय बालकवी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.21
टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील प्रसिद्ध कवी नाट्य कलावंत साहित्यिक कथाकार, यांची सहाव्या बालकवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण मराठी साहित्य मंच व व आंबेडकरी साहित्य मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या राज्यस्तरीय बालकवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक बालकथाकार टेंभुर्णी ज्यांची कर्मभूमी मानल्या जाते अशा टेंभुर्णी येथील डॉक्टर बबन महामुने यांची अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. 8 फेब्रुवारी 26 रोजी देवरजन प्रसिद्ध अति भेट परिसरात या भव्य संमेलनात भरणार आहे. या संमेलनात बालसाहित्यकांचे कवी संमेलन तसेच बाल साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन सुद्धा होणार आहे. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच नाट्य क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल तसेच साहित्य क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल आयोजकांनी त्यांना सन्मानपूर्वक पत्र देऊन बाल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण स्वीकारावं अशी विनंती नुकतीच त्यांना करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कार्याची या संमेलनाच्या निमित्ताने दखल घेण्यात आली आहे. बाल साहित्य मनावर संस्काराचे परिणाम व्हावे ही या पाठीमागची भूमिका असून अनेक बालसाहित्यिक या संमेलनात सहभागी होणार आहे या साहित्य जत्रेच्या माध्यमातून या परिसरामध्ये साहित्य क्षेत्राचा उत्सव साजरा होणार आहे सर्वांनी या साहित्य क्षेत्राचा लाभ घ्यावा असे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


