pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्ह्यातील रुग्णांनी आता घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.24

ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत आपल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा तज्ज्ञाकडुन आरोग्य सेवाचा लाभ घ्यावा. ही सुविधा आपणास सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 1.45 ते 5 वाजेपर्यंत ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे.
जिल्हा रुग्णालय जालना येथे आयुष्यमान आरोग्य मंदीर टेली कन्सल्टेशन हब कार्यरत आहे. येथे 3 विशेषज्ञ व 2 वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहे. यासाठी https://esanjeevani.mohfw.gov.in/#/ किंवा क्यु आर कोड स्कॅन करावा. ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत आपल्या मोबाईलच्या सहाय्याने पुढीलप्रमाणे प्रक्रिया करावी. प्रथमत: आपला मोबाईल नंबर सत्यापित (व्हेरिफाय) करा. नोंदणी झाल्यानंतर टोकन जनरेट करा. नोटीफिकेशन मिळाल्यानंतर लॉग इन करा. तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहावी व त्यानंतर डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. ई-प्रिस्क्रीप्शन डाऊनलोड करा. अशाप्रकारे आपणास घर बसल्या रुग्ण सेवेचा लाभ घेता येईल. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे