pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

प्रा. निलेश सोनवणे हे जिल्हा परिषद उमेदवारीसाठी ठरताहेत प्रबळ दावेदार

स्थानिक कार्यकर्त्याचा कल आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्राध्यापक निलेश सोनवणे यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत आहे

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ.संभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.28

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावपातळीवर राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत अनेक गावांमध्ये विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार तयारीच्या मोडमध्ये दिसत आहे अशात प्रा. निलेश सोनवणे यांनी बजाज नगर वडगाव कोल्हाटी गट नंबर 51 जोरदार तयारी सुरू केली आहे निलेश सोनवणे हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम अग्रेसर राहून समस्याचे निराकरण करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात गेले अनेक वर्षे नागरिकासाठी निष्ठेने काम केले असून दिलेला वेळ दाखवलेली निष्ठा आणि जनसंपर्क याच त्यांच्या उमेदवारीच्या प्रमुख ताकदी ठरतील स्थानिकांचा विश्वास आहे स्थानिक कार्यकर्त्यांचा कल आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रा निलेश साहेबराव सोनवणे यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत आहे आसा निलेश सोनवणे यांनी जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्या सोडून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या भागातील रस्ते पिण्याचे पाणी शेतकरी सुविधा सार्वजनिक बांधकामे कामगारासाठी योजना प्रत्यक्षपणे राबवल्या असुन त्यांनी राजकारणापेक्षा सामाजिक कार्य केल्याने या भागात सामाजिक सलोखा आणि एकोपा राखत विकासाचा वेग वाढवला आहे राजकारणासोबत सामाजिक क्षेत्रातही निलेश साहेबराव सोनवणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी युवकांना प्रोत्साहित केले व कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवला आणि गरजूसाठी मदतीचा हात पुढे केला यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि लोकसंपर्कात जाळे निर्माण केले हे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्ष संघटनेत सातत्याने सक्रिय भूमिका निभावली आहे आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी पुढाकार घेण्याचा त्यांचा निर्धार आहे त्यांचा अनुभव नेतृत्वावर असलेला विश्वास आणि स्थानिक जनतेचा पाठिंबा पाहता बजाज नगर वडगाव कोल्हाटी गट नंबर 51 निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित दिसत आहे बजाज नगर वडगाव कोल्हाटी ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू असून प्राध्यापक निलेश साहेबराव सोनवणे हे विकासाचा चेहरा म्हणून पुढे यावेत अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे