pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अभ्यास , त्याग, मेहनती शिवाय पर्याय नाही – शिक्षणाधिकारी खरात

कर्जत येथील राजुरेश्वर विद्यालयात गणित मेळावा उत्साहात संपन्न...

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

अंबड/प्रतिनिधी,दि.28

सध्याचं युग हे स्पर्धेचे युग आहे.विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अभ्यास हा एकमेव पर्याय आहे.जिंकण्याचे आयुध म्हणजे अभ्यास आहे.त्यामुळे त्याग, मेहनत व अभ्यासाशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही.असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब खरात यांनी केले.
थोर गणितज्ज्ञ श्रीनिवासन रामानुजन अय्यंगार यांच्या जयंतीचे औचित्य साधत राजुरेश्वर शिक्षण संशोधन सेवा संस्था, जालना.संचलीत अंबड तालुक्यातील कर्जत येथील राजुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी (दि-२६) डिसेंबर रोजी माध्यमिक विभागाचे गणित शिक्षक सचिन टेकाळे, प्राथमिक विभागाचे अभिजीत उंडे यांच्या वतीने गणित मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून माध्यमिक विभाग (जिल्हा परिषद जालना) चे शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक वर्गात जात वर्गातील डिजीटल चार्ट, स्मार्ट टि.व्ही विद्यार्थींनीनी काढलेल्या गणितीय रांगोळींची पाहणी केली.त्यानंतर विद्यालय परिसरातील डेंन्स फाॅरेस्ट, आॅक्सीजन पार्क, नक्षत्रवनाची पाहणी केली. हिरवाईने नटलेला परिसर पाहून शिक्षणाधिकारी भाराहुन गेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.राहुल पाटील डोंगरे तर प्रमुख उद्घाटक तथा मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद जालन्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक अशोक गायकवाड, केंद्रप्रमुख उध्दव बाजड, श्री ठाकुर, मुख्याध्यापक प्रकाश गुंजकर, श्री हुलमुख, मुख्याध्यापक हनुमान सानप, सरपंच संजय काळुंके,माजी सरपंच विजय डोंगरे, चेअरमन ज्ञानेश्वर डोंगरे, उपसरपंच आण्णासाहेब डोंगरे, माजी सरपंच श्रीहरी डोंगरे, सुनील काळुंके, पुरूषोत्तम शिंदे, परमेश्वर बनकर, पो.पा.जगदीश पवार, बाबु घुले उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात गणितज्ज्ञ श्रीनिवासन अय्यंगार व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व भिमराव पाटील डोंगरे आबा यांच्या प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने झाली.इयत्ता १२ वीच्या विद्यार्थीनीने पाहुण्यांचे स्वागतगीत गात शब्द सुमनाने स्वागत केले.विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.तसेच इ.१० वीच्या विद्यार्थीनींनी बनवलेल्या गणितीय ग्रीटिंग्स मान्यवरांना भेट देण्यात आल्या.गणितावर आधारित गीत, कविता, नाटीका, उखाणे यांचे सादरीकरण करण्यात आले.माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणितीय प्रश्नमंजुषा स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी रामेश्वर बनकर, प्रकाश गुंजकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर गणितशिक्षक श्री टेकाळे यांनी गणित मेळाव्याचा उद्देश व महत्व विशद केले.शिक्षणाधिकारी यांनी गणित मेळाव्याचे फित कापून उद्घाटन केले.तसेच मेळाव्यात मांडलेल्या विविध प्रोजेक्टची पाहणी करत विद्यार्थांशी संवाद साधला. माध्यमिक विभागाचे ७६ प्रोजेक्टचे सादरीकरण करण्यात आले होते.संस्था संचलीत राजुरेश्वर विद्यालय, चिकनगाव, जि.प.क्रेंद्रिय प्रा.शाळा कर्जत च्या विद्यार्थांनी मेळाव्यास भेट दिली.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल शिक्षणाधिकारी यांनी सचिव डॉ राहुल पाटील डोंगरे, प्राचार्य विलास टकले यांचा तर गणित मेळाव्याचे यशस्वी व उत्कृष्ट आयोजनाबद्दल शिक्षणाधिकारी यांनी गणित शिक्षक श्री सचिन टेकाळे, श्री अभिजीत उंडे यांचाही सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विलास टकले सर, सुत्रसंचलन प्रा.सुभाष जिगे ,तर आभार अभिजीत उंडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्रा.ओमप्रकाश घुगे , प्रा.भरत शेरे , अंकुश वीर, धनाजी जाधव, सुनील चव्हाण , सुंदर बुनगे, ज्ञानेश्वर पैठणे, श्री.वैभव मुळी शिक्षकेत्तर कर्मचारी मनोहर मिसाळ, विलास घुले, अशोक उगले, वाल्मिक सपकाळ, विष्णु घुगे यांच्या सह विद्यार्थांनी मेहनत घेतली.

________________________________________

गणित मेळाव्याच्या माध्यमातून गणिताच्या अनेक अवघड संकल्पना सोप्या होण्यास मदत होते. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे अवघड वाटणारा विषय सोपा होतो, तसेच विषयाची भिंती दुर होते. अशा उपक्रमांचे खरंच कौतुक आहे. विद्यार्थ्यांनी अशा विषयात नवनवीन कल्पना वापरून संशोधन वृत्ती जोपासत संधीचे सोने करावे.

डॉ.राहुल पाटील डोंगरे
सचिव, राजुरेश्वर शिक्षण संशोधन सेवा संस्था,जालना

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे