जालना महानगरपालिका निवडणूक हि पुढच्या पिढीची भविष्य ठरविणारी निवडणूक, त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता देऊ नका – भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण

जालना/प्रतिनिधी,दि.6
जालना महानगरपालिका निवडणूक हि पुढील पिढीची भविष्य ठरविणारी निवडणूक असल्यामुळे मतदारांनी चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता देऊ नका, केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना जालना महानगरात राबविण्यासाठी व जालना शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी जालना महानगर पालिकेत भाजपाला विजयी करण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.श्री.रवींद्र चव्हाण यांनी जालना येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना केले.
यावेळी महानगरपालिका निवडणूक प्रभारी तथा माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आ.बबनराव लोणीकर, भाजपा जालना ग्रा. जिल्हाध्यक्ष नारायणभाऊ कुचे, आ.संतोष पाटील दानवे, निवडणूक प्रमुख कैलासजी गोरंटयाल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे, प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, सिद्धिविनायक मुळे, माजी नगराध्यक्षा संगीताताई गोरंटयाल, युवानेते अक्षय गोरंटयाल, युवानेते प्रतिक भैया दानवे, देविदास देशमुख, वसंतराव जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे म्हणाले की, जालना महानगरपालिका निवडणूक हि इतिहास घडवणारी आहे, तुमचे एक मतदान कमळाला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाला आहे, केंद्रात व राज्यात भाजपचा पंतप्रधान व मुख्यमंत्री असल्यामुळे जालना शहराचा पहिला महापौर हा भाजपचा निवडून देण्यासाठी भाजपाच्या सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा मी जालना शहराच्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मनपा हि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेची आहे त्यामुळे भाजपा पदाधिकारी यांनी जालना महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


