भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.6
शैक्षणिक वर्ष 2025-26 योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेबर 2025 पर्यंत स्विकारण्यात आलेले होते. सन 2025-26 या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन भरलेले अर्ज विद्यार्थ्यांनी दि. 8 ते 16 जानेवारी 2026 पर्यंत सकाळी 10.30 ते 4.30 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण जालना या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजु एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या/शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी अकरावी, बारावी तसेच बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणीक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. असेही कळविले आहे.


