10 व 12 वी परीक्षेसाठीचे केंद्र संचालक व पर्यवेक्षक स्थलांतराचा निर्णय रद्द करावा!

जालना/प्रतिनिधी, दि.14
महाराष्ट्र राज्य मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉ .त्रिगुणजी कुलकर्णी साहेब यांच्याशी शिक्षक आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉ प्रशम कोल्हे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय भातलवंडे पुणे शहर अध्यक्ष प्रा सुनील मोरे यांनी भेट घेतली यामध्ये अनेक विषयावर चर्चा केली फेब्रु./मार्च 2026 च्या 10वी व 12 वी परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक, शिक्षक,(परीक्षा संबंधित) सदर केंद्रावरील नियुक्ती इतर केंद्रावर निर्णय रद्द करणे बाबत व इतर बोर्ड विषयी चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे एका विद्यार्थ्यांला देश सेवा (NDA) करण्याची संधी मिळणार होती परंतू अधिकाऱ्यांच्या अडमुठे पणामुळे, धोरणामुळे देश सेवा करण्याची संधी हुकणार होती तो विध्यार्थी सार्थक गणेश पदमशली सध्या एम आय टि ज्यु कॉलेज मधे आहे त्याच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला, गॅजेट सर्टिफिकेट, पुणे विभाग शिक्षण उपसंचालक यांची ऑर्डर हे सर्व पुरावे असताना व शिवाय शाळेचे पत्र उपलब्ध असताना देखील याच्या जन्म तारखेतील बदल हा नियमानुसार करणे क्रंमप्राप्त होते याचा अर्थ गॅजेट म्हणजे सर्व सामान्यांसाठी केलेली न्याय व्यवस्था याला ही अधिकारी मान्य करत नसतील तर लोकशाही मधे सर्वसामान्य विध्यार्थ्याला न्याय मिळणे अवघड होते त्यासाठी सर्व पुरावे सादर करून डॉ. प्रशम कोल्हे सर यांनी पुढाकार घेवून न्याय मिळवून दिला या कामी अध्यक्ष साहेब यांचे सहाय्यक श्री शिंदे सर यांचे खूप मोलाच मार्गदर्शन व त्वरित विद्यार्थ्याला न्याय मिळवून दिला त्याबद्दल त्यांचे आभार


