pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा………

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.15

सिद्धार्थ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 32 वा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अनिल वैद्य यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे व उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी नामविस्तार आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख वक्ते प्रा.अनिल वैद्य यांनी आपल्या भाषणात म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावा साठी दलित समाजानं लढलेल्या सतरा वर्षांच्या संघर्षाचा इतिहास सांगुन , नामविस्तार चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रमेश देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात विद्यापीठ नामविस्ताराच्या 17 वर्षाच्या संघर्षाचा इतिहास सांगितला.व यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली हे न विसरणारे आहेअसे मत व्यक्त केले. एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने सिम्बाॅल ऑफ नॉलेज हि पदवी बहाल केली . तर दुसऱ्या बाजूला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी सतरा वर्षांचा संघर्ष का करावा लागला. याचा सविस्तर आढावा घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संतोष पहारे यांनी केले, तर प्रा.एस.एम.पाटील यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे