pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

रोजगार मेळाव्यात 34 उमेदवारांची निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 15 

जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सभागृहात बुधवार दि. 14 जून, 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधी आयोजित करण्यात आली. यामध्ये 55 उमेदवारांनी सहभाग नोंदवून 4 नियोक्त्याकडे मुलाखती दिल्या यामधून 34 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खाजगी कंपन्या कारखाने, उद्योग व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. महिको प्रा. लिमिटेड जालना यांनी 4 तर नव-भारत फर्टिलायझर्स लि. औरंगाबाद यांनी 10 तसेच पिपल ट्री व्हेंचर्स प्रा. लि औरंगाबाद यांनी 4 आणि टॅलेनसेतु सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड पुणे यांनी 16 अशी एकूण 34 उमेदवारांची प्राथमिक निवड केली. या कार्यक्रमाचे उदघाटन सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे क.कौशल्य विकास , रोजगार  व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे