pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मिनी ट्रॅक्टर व उपसाधने वाटपाची योजना ;अर्जातील त्रुटींच्या पुर्ततेसाठी मुदतवाढ

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 15 

 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सन 2022-23 या वर्षाकरीता अर्ज मागविण्यात आले होते. सदरील अर्जाची छाननी करून पात्र व त्रुटीची पुर्तता असणाऱ्या बचत गटांची यादी प्रस्तुत कार्यालयातील सुचना फलकावर डकविण्यात आलेली आहे. बचत गटांनी अर्जासोबत दिलेल्या पत्यावर त्रुटी पुर्तता करण्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. बचतगटांनी दि. 15 जुन 2023 पर्यंत त्रुटी पुर्तता करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तथापी त्रुटीची पुर्तता सादर करणाऱ्या बचत गटांची मागणी लक्षात घेता त्रुटी पुर्तता करण्यासाठी दि. 23 जुन,2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेंतर्गत अर्ज केलेले आहेत, अशा बचतगटांनी त्रुटीची पुर्तता करण्यासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे छायांकित प्रतीसह सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयात सादर करावेत, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे