pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा कार्यालयात अभिवादन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.25

भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय जालना येथे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रध्येय अटलबिहारी यांची आज दि. 25 डिसेंबर रोजी अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आ.कैलासजी गोरंटयाल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, माजी जिल्हाध्यक्ष अशोक पांगारकर, सतीश जाधव, रिपाई नेते ब्रम्हानंद चव्हाण, प्रदेश निमंत्रित सदस्य विजय कामड, विमलताई आगलावे, युवानेते अक्षय गोरंटयाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रावसाहेब पाटील दानवे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्याना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, मी स्वत पंधरा वर्ष अटलजींच्या सोबत संसदे मध्ये काम केले, अटलजींची काम करण्याची पद्धत अतिशय संवेदनशील होती, त्यांनी सभागृहात त्यांच्या भाषणामध्ये अनेक जुने उदाहरणे देत असे, ते पंतप्रधान पदावर असताना सुद्धा ते कवी व लेखक असल्या कारणाने अनेक कविता त्यांनी लिहिल्या, त्यांच्या नेतृत्वामध्ये ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टी ची स्थापना झाली व भारतीय जनता पार्टी चे मुंबई येथील वांद्रे परिसरातील रेक्लमेशन मैदानावर पहिले राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आले, त्या अधिवेशनात मी पूर्ण वेळ उपस्थित होतो. स्थापणे नंतर १९८५ च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी चे देशात दोन खासदार निवडून आले, त्यावेळी सभागृहामध्ये कॉंग्रेस नेते “देशात राज्य करणार कोण ज्यांचे संसदेत खासदार दोन” नारा देऊन अपमानित करण्याचा प्रयत्न करीत असे त्याचवेळी अटलजीनी सभागृहात अतिशय खंबीरपणे उभे राहून सभागृहात उत्तर दिले एक दिवस असा येईल आमचे दोन चे दोनशे खासदार निवडून येतील आणि त्या दिवशी आम्ही सत्तेत असू आणि कॉंग्रेस विरोधात असेल असे उत्तर देऊन पक्षाने अटलजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी चा संघटनात्मक पाया अतिशय मजबूत रचल्याने देशात अटलजींच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले व सन २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीचे २८३ व २०१९ मध्ये ३०२ खासदार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी अटलजींनी उभारलेल्या पायावर कळस चढवून इतिहास रचला व १९८० च्या पहिल्या अधिवेशनात अटलजीनी केलेली भविष्यवाणी अंधेरा छटेगा सुरज निकलेगा कमल खिलेगा हि पूर्ण केली असे त्यांनी सांगितले.

यावेळी सोपान पेंढारकर, नगरसेवक चंपालाल भगत, ज्ञानेश्वर ढोबळे, जीवन सले, माजी जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख, राजेश जोशी, गोवर्धन कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, सिद्धिविनायक मुळे, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, वसंत शिंदे, अरुणाताई जाधव, सखुबाई पणबिसरे, ममता कोंड्याल, वर्षा ठाकूर, वैशाली बनसोडे, दिपाली बिन्नीवाले, स्नेहा जोशी, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, अमोल धानुरे, संजय डोंगरे, अॅड सतीश तवरावाला, राजेंद्र भोसले, उमेश अग्रवाल, रवी अग्रवाल, सुभाष सले, शिवराज जाधव, बाबुराव भवर, बद्री जांगडे,  शाम उगले, सोमेश कबलिये, गणेश जल्लेवार, सिद्धेश्वर हाजबे, आनंद झारकंडे, डोंगरसिंग साबळे, रोहित नलावडे, अमन मित्तल, रामलाल जाधव, रणजीत रीडला, गौरव गोधेकर, प्रवीण मोहता, सुदर्शन काळे, गुलाब पणबिसरे, अनिल संचेती, कृष्णा खिल्लारे, करण झाडीवाले, संजय माधवाले, भगवान चांदोडे, अक्षय जगदाळे, विकास कदम, आकाश सिंग बावरी, सतीश अकोलकर, विशाल उफाड, राजेंद्र जगताप, शिवम ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे