pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महेंद्रशेठ घरत यांच्याकडे कोकणाची संपूर्ण जबाबदारी सोपवा

जिल्ह्यातील काॅंग्रेस पदाधिकारी यांची आढावा बैठकीत मागणी शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19

“महेंद्रशेठ घरत हे काॅंग्रेसचे निष्ठावंत जिल्हाध्यक्ष आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करतात. त्यांच्याकडे दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व हे सर्वच गुण आहेत. साम, दाम, दंड भेद या नीतीचा वापर करण्यात ते वाकबगार आहेत. त्यामुळे कोकणाची संपूर्ण जबाबदारी महेंद्रशेठ घरत यांच्याकडेच द्या,” अशी रायगड जिल्ह्यातील काॅंग्रेसच्या सर्वच पदाधिकारी यांनी पनवेल तालुक्यातील शेलघर येथे गुरुवारी (ता. १९) मागणी केली.

“काॅंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. जे लोक काॅंग्रेसला सोडून गेलेत, ते स्वार्थी होते. रायगडमध्ये नव्याने काॅंग्रेस पक्ष उभा करायचा आहे. त्यासाठी येथील काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या जातील. महेंद्रशेठ घरत यांच्यावर लवकरच योग्य जबाबदारी सोपविण्यात येईल,” असे काॅंग्रेसचे कोकण विभागाचे प्रभारी यू. बी. व्यंकटेश हे शेलघर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव, कोकण विभागाचे प्रभारी यू. बी. व्यंकटेश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तसेच रायगड जिल्ह्याचे निरीक्षक राजेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी राजेश शर्मा म्हणाले, “गांधीवाद घराघरांत पोहचवा, काॅंग्रेसचे कार्यकर्ते सक्षम आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढण्यासाठी कामाला लागा.”

पनवेल तालुक्यातील शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाज मंदिरात रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक गुरुवारी यशस्वीरित्या संपन्न झाली.यावेळी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते, खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसा निमित्ताने युवक काँग्रेस तर्फे ५०० रोपांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या उपस्थितीत केले.

या बैठकीला काँग्रेसचे रायगड जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, तसेच महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.जिल्हा प्रभारी राणीराई अग्रवाल, सहप्रभारी श्रीरंग बर्गे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा,अकलाख शिलोत्री, महेंद्र ठाकूर, नाना म्हात्रे, जे. डी. जोशी, श्रद्धा ठाकूर, काका ठाकूर, विनोद म्हात्रे,संजय गवळी, भास्कर चव्हाण,वैभव पाटील, किरीट पाटील, चिंतामण मकु, रिचर्ड जॉन निखिल डवले तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.सदर बैठक खेळीमेळीच्या वातावरणात मोठया उत्साहात संपन्न झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे