pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

युनायटेड ग्लोबल फेडरेशन तर्फे जि प शाळा डावरगाव देवी येथे स्कूल बॅग वाटप

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20

युनायटेड ग्लोबल फेडरेशन मार्फत 3000+ स्कूल बॅग महाराष्ट्र भर सुरू असलेल्या स्कूल दफ्तर वाटप उपक्रम आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डावरगाव देवी येथे 1 ते 5 वीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग वाटप डावरगाव देवी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डावरगाव देवी येथे इयत्ता 1 ते 5 वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक प्रोत्साहन या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे मोलाचे क्षण पाहायला मिळाले या प्रसंगी युनायटेड ग्लोबल फेडरेशन तर्फे मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमास उपस्थित दुर्गेश बनकर चेअरमन युनायटेड ग्लोबल फेडरेशन ज्ञानेश्वर शास्त्री सुसार ,मुकेश माकोडे,भागवत लोखंडे,वैभव लाखोले,उमेश गिराम,नारायण नवले,आकाश नवले,समाधान नवले,कुलदीप नवले यावेळी चेअरमन दुर्गेश बनकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
त्यांनी सांगितले गावातील प्रत्येक मुलाने मोठी स्वप्ने पाहावीत. शिक्षण हीच खरी शक्ती आहे. मनापासून अभ्यास करा भविष्य नक्की उज्ज्वल होईल त्यांच्या शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला.
या सामाजिक उपक्रमाचे गावातील पालक शिक्षक आणि ग्रामस्थांनी कौतुक केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे