ब्रेकिंग
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव चित्ररथास जिल्हाधिकारी यांनी दाखविली हिरवी झेंडी
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि. 1
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृतीसाठी रवाना केले.
या चित्ररथाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. जालना जिल्हयातील सर्व तालुक्यात हा चित्ररथ फिरणार आहे. सदर कार्यक्रमप्रसंगी उपजिल्हाधिकारी संगीता सानप, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, नायब तहसिलदार विक्रांत मोंढे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


