pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यात 14 ऑक्टोबरला मद्य विक्री बंद

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.13

मौजे अंतरवाली सराटी ता. अंबड या गावात मराठा आरक्षणा संदर्भात दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी सभा होणार असल्याने मौजे अंतरवाली सराटी या परिसरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना मुंबई दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 142 (1) अन्वये अंबड, घनसावंगी व परतुर या तिन्ही तालुक्यांतील सर्व ठोक व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्य अनुज्ञप्त्यांचे व्यवहार व मद्य विक्री दि. 14 ऑक्टोबर, 2023  रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे (कोरडा) आदेशीत केले आहे. आदेशाचे पालन सर्व संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कसूरदार ज्ञप्तीधारकांविरुध्द नियमातील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे