pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मोफत उपचारासाठी सर्वानी आयुष्मान कार्ड काढावे तहसीलदार विनोद गुडंमवार

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.3

केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतुन प्रधानमंत्री व महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वाना मोफत उपचारासाठी नांदेड जिल्हाधिकारी डॉ.अभीजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे , तहसीलदार विनोद गुडंमवार,बिडीओ कैलास बळवंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे , हदगांव उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ प्रदिप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड काढण्यात येत आहे. आयुष्मान कार्ड काढण्यासाठी आरोग्य प्रशासनासह आपले सरकार सेवा केंद्र,सिएससी केंद्र , आशा वर्कर , आरोग्य मित्र यांच्यासह आधार लिंक असलेल्या मोबाइल वरुन काढण्यात येत आहे.पंरतु आवश्यक तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळून येत आले आहे.यामुळे हदगांव तालुक्यातील नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढण्यासाठी संबधित विभागाला आवश्यक त्या सुचना करीत सर्वानी आयुष्मान कार्ड काढावे असे आवाहन तहसीलदार विनोद गुडंमवार यांनी केले आहे.
बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस जी.भिसे व डॉ के.सी.बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली बरडशेवाळा येथे हनुमान मंदिर सभागृहात घेतलेल्या शिबीरात 98 लाभार्थाना आयुष्मान कार्ड करून देण्यात आले. यावेळी हदगाव उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य मित्र प्रशांत कदम , बरडशेवाळा येथील आरोग्य सहायक संतोष स्वामी, श्रीमती काळसरे सिस्टर, शेख एजाज, शिवकांत पांढरे यानी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे