pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत दिक्षित यांच्या निस्वार्थ व प्रामाणिक सामाजिक कार्याचा भावी पिढींनी आदर्श घ्यावा

-श्रध्दांजली सभेत अनेकांनी व्यक्त केले.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

पुणे/ आत्माराम ढेकळे,दि.3

पुणेः- येथील धनकवडी भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दिक्षित यांनी आपल्या आयुष्यात सातत्याने समाजात सर्वांंसी संपर्कात राहुन निस्वार्थ व प्रामाणिकपणे सामाजिक कार्य केले.त्यांच्या कार्याचा आदर्श भावी पिढींनी घ्यावा.असे आयोजित भावपूर्ण श्रध्दांजलीपर सभेत अनेकांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेत व्यक्त केले.
सोनार समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत नारायण दिक्षित यांचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘संत नरहरी महाराज मंदिर’ ,विश्वकर्मा पांचाळ सुवर्णकार(सोनार )कार्यालय ,धनकवडी,पुणे येथे तेरावा विधी दिनी श्रध्दांजलीपर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटणकर यांनी केले.कै.चंद्रकांत दिक्षित यांनी समाजासाठी आपले महत्वपुर्ण योगदान दिले.ते तळमळीने सामाजिक कार्यात सहभाग घेत असत.शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना सामाजिक कार्याचा ध्यास होता.कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी निस्वार्थ व प्रामाणिकपणे सर्वशाखीय सोनार समाजासाठी कार्य केले.तसेच त्यांच्या कार्याच्या आढाव्यात त्यांनी सोनार समाजाची खानेसुमारीचे कार्य हाती घेतले होते.प्रामुख्याने श्री संत नरहरी सोनार विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून सामुदायिक विवाह, व्रतबंध सोहळा तसेच सुवर्णकार सराफ अधिवेशन आदी कार्यक्रमात महत्वाचा सहभाग होता.त्यांची कार्य करण्याची तळमळ व शिकवणीचा आदर्श भावी पिढींनी घेऊन त्यांचे अपुर्ण कार्य युवकांनी पुर्ण करावे.असे या सभेत श्रध्दांजलीपर बोलतांना समाजातील व्यक्तींनी व्यक्त केले. प्रामुख्याने समस्त विश्वकर्मा पांचाळ सुवर्णकार समाज श्री क्षेत्र आळंदीचे अध्यक्ष रमेश भावेकर,सचिव संतोष पंडीत,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय काजळे,दिलीप महामुनी,गणपत दिक्षित,बाळा पाटणकर, विश्वकर्मा पाचांळ सुवर्णकार (सोनार)समाज चे अध्यक्ष आशिष पाटणकर,सचिव लक्ष्मण पाटणकर,लाड सुवर्णकार समाज धर्मशाळा ट्रस्ट पुणे चे अध्यक्ष अजय डहाळे,पत्रकार आत्माराम ढेकळे आदींनी या सभेत आठवणींना उजाळा देऊन भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.या कार्यक्रमास समाजबांधव,भगिणी , मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी शोकाकुल दिक्षित परिवारांचे अनेकांनी भेट घेऊन सात्वंन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे