pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा अंतर्गत 29 नोव्हेंबर रोजी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.23

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनाच्या प्रचार व प्रसारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी वेळ 11.00 वाजता मातंग व तत्सम 12 पोट जातीतील समाज बांधवांसाठी महामंडळामार्फत रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मातंग व तत्सम 12 पोट जातीतील समाज बांधवांसाठी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याकरीता योजनांचा प्रचार व प्रसारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उपस्थित मातंग समाज बांधवांना मार्गदर्शन करण्याकरीता महाव्यवस्थापक व व्यवस्थापकीय संचालक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच समाजातील कार्यकर्ते, यशस्वी उद्योजक, महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी,
पुरस्कार विजेते मान्यवर व नामांकित व्यक्ती यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी समाज बांधवांनी बहुसंचख्येने या मेळाव्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कुल शेजारी खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही.एस.सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे