pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सखी निवाससाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.23

नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोयस्कर पध्दतीने निवासाच्या संस्थेकरिता केंद्र शासनाच्या दिनांक 14 जुलै 2022 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती योजने अंतर्गत सबल आणि सामर्थ्य या दोन योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनेतील सामर्थ्य या उपयोजने अंतर्गत महिलांसाठी सखी निवास या उपयोजनेचा समावेश आहे. राज्यात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतीगृहांव्यतिरिक्त आणखी नवीन 50 सखी निवास कार्यान्वित करावयाची आहेत.

राज्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या शहरामध्ये सुरक्षित आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हयातुन भाडे तत्वावरील इमारतींमध्ये सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांचे मार्फत दि. 3 जुन 2023 रोजी आणि 11 सप्टेंबर 2023 रोजी जाहिरात देऊन प्रस्ताव मागविण्यात आले होते तथापि पुरेशा प्रमाणात प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील इच्छुक संस्था/एजन्सी यांचे कडून पुनश्चः प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

त्यानुसार याव्दारे सदर योजने अंतर्गत जालना जिल्हयातील भाडे तत्वावरील इमारती मध्ये सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार पात्र संस्था एजन्सी यांचेकडून विहित पध्दतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

या योजने अंतर्गतचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती, अर्जाचा नमुना, संस्था/एजन्सीच्या पात्रतेचे निकष इ. माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, तळ मजला प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कर्यालय जालना येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्याची मुदत जाहिरात प्रसिध्द झालेपासुन 15 दिवसांच्या आत (5 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत) राहिल. इच्छुक संस्था/एजन्सी यांनी विहित नमुन्यात व विहित मुदतीत एकूण 5 प्रतित प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे