pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन-   2023 या प्रकाशनाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.8

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन हे प्रकाशन अर्थ व सांख्यिकी संचालनायामार्फत दरवर्षी जिल्हास्तरावर जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जालना या कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात येते. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -2023 हे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या प्रकाशनात सन 2022-23 या वर्षातील आर्थिक व भौतिक प्रगतीची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जिल्ह्यांची ठळक वैशिष्टे प्रकाशनाच्या पहिल्या भागात दिली असून दुसऱ्या भागात कृषि, उद्योग, सहकार, उर्जा, पाणी पुरवठा व स्वच्छता, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, त्याचप्रमाणे 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची माहिती आणि क्षेत्रवार जिल्हा उत्पन्न व दरडोई उत्पन्न इत्यादी निरनिराळ्या विषयांवरील सांख्यिकी तक्ते दिले आहेत. या प्रकाशनाची प्रत पीडीएफ स्वरुपात www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सदर प्रकाशनाच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद वर्षा मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त महानगरपालिका संतोष खांडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सुर्यवंशी व उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय, कुंदन कांबळे हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे