pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

राष्ट्रीय क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनीधी,दि.19
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा क्रीडा परीषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान राष्ट्रीय क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहा दरम्यान विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात आले. सप्ताहाचा समारोप क्रीडा संकुल जालना येथे फुटबॉल स्पर्धा आयोजीत करून करण्यात आला. सप्ताहाच्या समारोप प्रसंगी व फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह तलवारबाजी असोसिएशनचे सचिव विजय गाडेकर, इम्रान सिद्दीकी, नवीद खान, निहाल खान, पवन दांडगे, वसीम शेख, फारूक शेख, अकील शेख, राहुल गायके, हारूण खान, समाधान खुराड, आदींची उपस्थिती होती.
फुटबॉल स्पर्धेत फरहान एफ सी क्लब, जालनाने प्रथम क्रमांक तर जिल्हा फुटबॉल प्रशिक्षण केंद्र संघाने दुसरा क्रमांक प्रात्त केला. विजयी संघाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रेखा परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन ईस्माईल शेख यांनी केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे