pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

 “विकसित भारत संकल्प यात्रेत” शासकीय योजनांना जागर गुरुवार, 21 डिसेंबर रोजीचे यात्रेचे वेळापत्रक

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.20 

केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा”  सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय योजना गावागावांत नेणाऱ्या या  “विकसित भारत संकल्प यात्रे” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

गुरुवार, दि. 21 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार विकसित भारत संकल्प यात्रा – विकसित भारत संकल्प यात्रा गुरुवार, दि. 21 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव व जवखेडा ठोंबरी, जालना तालुक्यातील नासादगाव व घोडेगाव, अंबड तालुक्यातील वालखेडा व पांगरखेडा, परतूर तालुक्यातील सेलगाव व टाकळी रंगोपंथ, जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी व काळेगाव,  मंठा तालुक्यातील बेलोरा येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.

विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे