pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्यांना घेऊन चालणारे होते– रमेश पाटील गव्हाड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 17

वंदनीय स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी प्रतिमेस पुष्पहार आणि आदरांजली अर्पण करताना उपस्थित शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या जीवन कार्यावर काही निवडक वक्त्यांनी प्रकाश टाकला यामध्ये शिवसेना नेते रमेश पाटील गव्हाड रामधन पाटील कळंबे कुंडलिक पाटील मुठे बाळासाहेब धनवई सर पत्रकार संजय राऊत रावसाहेब अंभोरे *सर्वच वक्त्यांनी इतके जोरदार भाषण केली उपस्थितांच्या अंगावर शहारे आले आणि नवचैतन्य संचारले*
सर्वच वक्तांनी बाळासाहेबांच्या विचारा हे सर्वसामान्यांना तसेच मराठी माणसाला नवचैतन्य निर्माण करणारे होते असे सांगितले, बाळासाहेबांचा सर्व समाजाला घेऊन चालण्याचा आणि तळागाळातील लोकांना पुढे नेण्याचा विचार, आजही समाजातील प्रत्येकाला त्याची गरज आहे हे आवर्जून उल्लेख केला. सर्वसामान्यांसाठी बाळासाहेब अशी भूमिका घेऊन चालणारे नेत्यांची आज गरज आहे, असे सर्वच वाक्यांनी आपल्या भाषणातून सांगितल्या.
कार्यक्रमाचे आयोजन जनार्दन झोरे साहेब मित्र मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन गजानन मुळे तर आभार प्रदर्शन प्रल्हाद जाधव यांनी केले. याप्रसंगी माझी पंचायत समिती सदस्य किसन जोशी, माजी सरपंच विष्णू भाऊ जमदाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वानखेडे साहेब, गुड्डू माघाडे,जनार्दन झोरे, दत्तू सुधारित, पत्रकार शेख आसपाक, तसेच असंख्य पत्रकार सुद्धा उपस्थित होते तसेच पंचक्रोशीतील व गावातील सर्व शिवसैनिक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे